शेतकर्‍याने शेतातच उचलले असे पाऊल ! : परिसरावर शोककळा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तालुक्यातील सावखेडा सिम येथे आदिवासी शेतकर्‍याने टोकाचे पाऊल उचचले असून यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की सावखेडासीम येथील युसुफ सुलेमान तडवी (वय ४५ वर्ष राहणार सावखेडा सिम तालुका यावल) यांनी दिनांक ३ नोव्हेबर रोजी सकाळच्या सुमारास सावखेडा सिम शिवारातील शेतावरील बांधावर असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने स्वत:ला संपविल्याचे उघडकीस आले आहे.

या बाबत यावल पोलीस ठाण्यात मयताचे भाऊ मुराद तडवी यांनी खबर दिल्यावरून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , मयत युसुफ तडवी यांच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केलेत. यानंतर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण , पोलीस नाईक संजय देवरे व राजेन्द्र पवार हे करीत आहे.

दरम्यान, मयत युसुफ सुलेमान तडवी यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुतगी, एक मुलगा, चार भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content