फडणवीस जरा आत्मचिंतन करा ! : बाळासाहेब थोरातांचा सल्ला

शेअर करा !

मुंबई प्रतिनिधी । ‘लिव्ह इन’ हा भारतीय संस्कृतीतील शब्द नसून फडणवीस यांच्या मनात हे विचार येतात तरी कसे ? असा सवाल करत त्यांनी आत्मचिंतन करावे असा सल्ला महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

store advt

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चं सरकार आहे. आम्ही पाडायची गरज नाही स्वतःहून पडेल असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर आज महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिल आहे. या संदर्भात ते म्हणाले, भारतीय माणसाला आणि विशेषतः मराठी माणसाला लिव्ह इन रिलेशन काय असतं, हे माहितीही नाही. यांच्या मनात हे विचार येतातच कसे? हे कोणत्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात हा प्रश्‍न आहे. हा भारतीय संस्कृतीतला शब्द नाही. त्यांनी माहिती घ्यावी आणि याबाबतीत आत्मचिंतन करावं असा सल्ला थोरातांनी देवेंद्र फडणवीसांना दिला.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!