बडोद्यात इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

बडोदा वृत्तसंस्था । येथे काम सुरू असणारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला असून ढिगार्‍याखाली अजून काही जण दाबले गेले असल्याची भिती व्यक्त होत आहे.

बडोदा येथे काम सुरू असलेली तीन मजली इमारत मध्यरात्री कोसळली आहे. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली आहे.

बडोद्यातील बावानानपूरा येथील मध्यरात्रीच्या सुमारास काम सुरू असलेली तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत एका बाजूला झुकली होती. लोकांनी याबाबत त्याची तक्रारही केली. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यानंतर सोमवारी रात्री अचानक ही इमारत कोसळली आणि या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला. तर ढिगार्‍याखाली काही जण अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content