राजीव गांधींच्या नावाने बबिता फोगटची काँग्रेसशी कुस्ती !

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । भारताची कुस्तीपटू बबीता फोगाट पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने देशातील सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव दिल्यावरून हल्ला चढवला आहे. बबीताने तिच्या शैलीने एक ट्विट केले जे सध्या व्हायरल होत आहे.

देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराशी माजी पंतप्रधानांचे नाव जोडण्यावर बबीता फोगाटने आक्षेप घेतलाय. बबीताने एक ट्विट केले आहे. राजीव गांधी यांनी एकदा भारतातून इटलीत भाला फेकला होता म्हणून खेल रत्न हा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो का?

बबीताचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शनिवारी दुपारी बबीताने हे ट्विट केले होते. .

बबीता फोगाट ही भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होती. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत बबीताने ३ वेळा पदक जिंकले आहे. ज्यात एका सुवर्ण आणि २ रौप्य पदकाचा समावेश आहे. त्या शिवाय तिने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदक जिंकले आहे.

Protected Content