रावेरात पोलिसांचे मास्क घालून पथसंचलन

रावेर, प्रतिनिधी । गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात पोलिसांनी पथसंचलन केले. यात मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ७ अधिकारी व २०० कर्मचारी सहभागी झाले होते.

गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त पथसंचलन करण्यात आले. या रूट मार्चमध्ये SDPO नरेंद्र पिंगळे , फैजपूर भाग फैजपूर, रॅपिड ऍक्शन फोर्सचे AC रमेश वर्मा व AC सारंग कुर्वे यांच्यासह ५`१जवान, SRPF अमरावती ग्रुप नं. ९ चे PSI तायडे यांच्यासोबत २० पोलिस कर्मचारी, RCP चे १ + २६ पो.कर्मचारी, पो. मु. जळगावचे स्ट्रॅकिंग फोर्स चे १ + ५ कर्मचारी, तसेच रावेर पोस्टचे API शितल कुमार नाईक, Psi अनिस शेख, Psi मनोजकुमार वाघमारे व १६ पो. कर्मचारी आणि रावेर युनिटचे ४५ होमगार्ड व यावल युनिटचे ३५ होमगार्ड सहभागी झाले होते. हे पथसंचलन रावेर पोलीस स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बऱ्हाणपूर जिलेबी, पंचशील नगर चौक, संभाजीनगर पूल, बंडू चौक, नागिजिरी, थळा भाग, पाराचा गणपती, विखे चौक, शिवाजी चौक, मुस्कान पान सेंटर, भोई वाडा , गांधी चौक, चो-हा, मेन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, परत रावेर पोलीस स्टेशन असा पथसंचन करण्यात आले.

Protected Content