अयोध्या निकाल : रावेरात पोलिस प्रशासन आणि शांतता कमिटीची रॅली

raver

रावेर प्रतिनिधी । सुप्रीम कोर्टने आज राम मंदिराबाबत महत्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वानी योगदान द्यावे, असे आवाहन देऊन पोलिस प्रशासन आणि शांतता कमिटीच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली.

रावेर शहरातील पोलिस स्टेशन येथून अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यावरुन ही रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल्याचा सन्मान करण्याचे आवाहन केले. यावेळी रॅलीत नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, तहसिलदार उषाराणी देवगुणे, विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पो.नि.रामदास वाकोडे, नगर पालिकेचे सीईओ रविंद्र लांडे, माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी, पद्माकर महाजन, नगर सेवक प्रल्हाद महाजन, असदलुल्ला खा, सादीक मेंबर, अॅड.योगेश गजरे, अॅड.आर.के.पाटील, अशोक शिंदे, ज्ञानेश्वर महाजन, दिलीप कांबळे, महेमुद शेख, यूसुफ खान, दिलीप वैद्य, शकील शेख यांच्यासह हिंदू-मुस्लिम, शांतता कमेटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

 

Protected Content