निकालावर आम्ही खुश नाही, रिपिटीशियनबाबत सल्ला घेऊ ; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड 

AyodhyaVerdictS1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुप्रीम कोर्टाने आज अयोध्यातील वादग्रस्त जागेबाबत निर्णयाबाबत आम्ही खुश नाहीत. पण आम्ही निकालाचा पूर्णत: आदर करतो. या संदर्भात रिपिटीशियन करायचे की नाही? यासंबंधी आम्ही योग्य तो सल्ला घेऊ, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे.

 

याबाबत माध्यमांशी बोलताना लॉ बोर्डाचे सदस्य जफरयाब जिलानी यांनी म्हटलं की, आम्ही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा आदर करतो. या निर्णयाबाबत रिपिटीशियन करायचं की नाही यासंबंधी आम्ही योग्य तो सल्ला घेऊ. तसेच देशातील नागरिकांना आवाहन करतो की, या निर्णयाप्रकरणी कोणत्याही प्रकारची निदर्शने करु नयेत. आम्ही कोर्टाने सुनावलेल्या निर्णयाच्या प्रत्येक भागावर टीका करत नाही. पण निर्णयामधील काही भाग असे आहेत की, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. या प्रकरणातील संपूर्ण निकाल वाचून नंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. आमच्या पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल,असेही जिलानी यांनी म्हटले.

Protected Content