औरंगजेब आणि उस्मान राज्य सरकारचा कोण लागतो ? :राऊतांचा सवाल

नागपूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा – महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या नामांतराचा निर्णय विद्यमान सरकारने बदलला असल्यास ते अतिशय दुर्दैवी आहे. औरंगजेब आणि उस्मान या सरकारचा कोण लागतो ? अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की मला नुकतीच माहिती मिळाली असून यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचा आम्ही नामांतराचा घेतलेला निर्णय बदलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हे वृत्त जर खरे असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. खरे तर प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेतूनच आम्ही या नामांतराचा निर्णय घेतला होता मात्र जर का हे सरकार नामांतर रद्द करत असेल तर औरंगजेब व उस्मान यांचा कोण लागतो ? हे देखील त्यांनी सांगितले पाहिजे असे राऊत म्हणाले.

याप्रसंगी संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की राज्यात आपत्तीची स्थिती असून देखील सरकार कुठेही काम करताना दिसत नाही. तर हे बेकायदेशीर सरकार असल्यामुळे मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील पुढे टाळण्यात आलेला आहे. दरम्यान संसदेत नवीन शब्दकोश तयार करून यात काही असंसदीय शब्दांची भर घालण्यात आलेली आहे. केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे त्यांनी घाबरून असे कृत्य केल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.

Protected Content