



भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रेल्वे स्टेशनवर बेवारस स्थितीत बॅग आढळल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे विभागाने काही परिसर सील करण्यात आला होता.
भुसावळ रेल्वे स्टेशनवर गुरुवार दि. १४ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास बेवारस बॅग आढळून आली. या बॅगला पोलीस पथकाने आणि बॉम्ब पथकाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्मनुष्य ठिकाणी पोलीस व्हॅनमध्ये घेऊन रेल्वे मैदानात उभी करुन बॉम्ब पथक स्कॉटच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. मात्र सदरील बॅगमध्ये कुठलंही संशयस्पद वस्तू मिळून आलेली नाही ,त्यामुळे एक तास सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला सुटकेचा श्वास घेतला. संबंधित व्यक्तीने ठेवलेल्या बॅगबाबत त्या व्यक्तीचा शोध घेतल्या जाईल आणि संबंधितवर कारवाई केली जाईल पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



