भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे विजेत्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला.
जळगाव येथे संपन्न झालेल्या खान्देश रनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ७० धावपटूंनी २१ किमी,१० किमी, ५ किमी व ३ किमी या वेगवेगळ्या गटात यशस्वी सहभाग नोंदविला. यावेळी दीपा स्वामी १० किमीमध्ये महिलांच्या गटात प्रथम ठरल्यात व उमेश घुले २१ किमीमध्ये पुरुषांच्या गटात तृतीय ठरले.
त्याचबरोबर एक वैशिष्ठ्य असे देखील कि ७० धावपटूंपैकी निम्म्याहून अधिक अर्थात ३६ धावपटू या महिला होत्या. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक एम .राजकुमार व त्यांच्या पत्नी रम्या कन्नन यांनी भुसावळच्या धावपटूंचे व असोसिएशनचे विशेष कौतुक केले व यावर्षी सुरुवातीस मार्च महिन्यात भुसावळ येथे संपन्न झालेल्या लेडीज रनच्या आठवणींना उजाळा दिला.
मंगळवारी सकाळी नियमित धावण्याचे सत्र आटोपल्यानंतर भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे विजेत्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुरुवातीस डॉ नीलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांनी दीपा स्वामी यांना पुच्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व पदक देऊन सन्मानित केले. त्यानंतर असोसिएशनचे प्रमुख प्रा प्रविण फालक यांनी उमेश घुले यांना पुच्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व पदक देऊन सन्मानित केले. यावेळी उपस्थित सर्व धावपटूंनी एकच जल्लोष केला.
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित लेडीज रन पासून धावण्याला सुरुवात केली व ग्रुपसोबत दर मंगळवार, गुरुवार व रविवारी सतत सराव केला. त्यामुळे हे यश मिळाल्याचे दिपा स्वामी यांनी नमूद केले. त्याचबरोबर एकटे धावत असतांना ग्रुपचे इतर सदस्य बहिणीप्रमाणे माझी काळजी घेतात व मार्गदर्शन करतात त्यामुळे हे यश केवळ भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनमुळे शक्य झाले असेही त्यांनी सांगितले.
रनिंग सुरु केल्यानंतर सुरुवातीस मला ग्रुपकडून कायम प्रोत्साहन मिळाले. शिवाय धावतांना कायम सातत्य ठेवले. त्यामुळे मी विजयी ठरलो असे उमेश घुले यांनी सांगितले. त्यानंतर प्रथमच शहराबाहेर मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या एकता भगत, शीला कश्यप, स्वाती भोळे, पुष्पलता चौधरी, गीता नारखेडे, सुनीता वाघमारे, सुनीता सिंग, मंजू शुक्ला, गुंजन गुप्ता, रीना परदेशी, सविता घाटे, मनीषा सिंग, सीमा वायकर, कीर्ती मोटाळकर या महिला धावपटूंना पूनम भंगाळेव स्वाती फालक यांनीं पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. त्याचबरोबर ताराचंद खरारे, डॉ आशिष राठी या नवोदित धावपटूंचा रणजित खरारे व प्रविण वारके यांनी सत्कार केला.
त्यानंतर खान्देश रनमध्ये अतिशय कमी वेळेत धाव पूर्ण करून चमकदार कामगिरी करणारे तरुण बीरिया , छोटू गवळी, संजय भदाणे, विजय फिरके, संतोष घाडगे, राजेंद्र घाटे, मंगेश चंदन या धावपटूंचा डॉ तुषार पाटील यांनी सत्कार केला. याशिवाय खान्देश रनच्या आतापर्यंत झालेल्या सातही मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याबद्दल डॉ नीलिमा नेहेते, सारंग चौधरी, प्रविण वारके, व प्रविण पाटील या चारही धावपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्रविण फालक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इसाक गवळी व नीलांबरी शिंदे यांचे सहकार्य लाभले.