भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील तपत कठोरा येथील रहिवासी तथा नुकतेच युपीएससी मध्ये यश संपादन केलेल्या कांतीलाल सुभाष पाटील यांचा लेवा पाटीदार महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.
भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथील कांतिलाल सुभाष पाटील यांनी नुकतेच केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील, केंद्रीय अध्यक्ष प्रकाश पाटील,उपाध्यक्ष राजेश चौधरी, माजी आमदार नीळकंठ फालक, माजी नगरसेवक अजय भोळे, प्रदीप भोळे, परीक्षित बर्हाटे ,आर .जी.चौधरी आदी उपस्थीत होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कांतीलाल पाटील यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिष्टचिंतन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.