मनोज जरांगे यांच्याशी विधानसभेला युती होऊ शकते – प्रकाश आंबेडकर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनोज जरांगेंसोबत लोकसभेला वंचितची युती झाली नसली, तरी विधानसभेला होऊ शकते. मनोज जरांगे यांना लोकसभेसाठी आघाडीचा प्रस्ताव दिला होता. मात्र औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या कार्यकर्त्यांनी मारामारी केली.
त्यामुळे जरांगे पाटील बॅकफूटवर गेले आणि प्रत्येक मतदारंसघात अशी मारामारी होईल अशी शक्यता त्यांना वाटली. त्यामुळे त्यांनी निरोप पाठवला की आता मी थांबतोय. आपण पुन्हा विधानसभेला बघू. त्यामुळे विधानसभेला त्यांच्यासोबत युती होऊ शकते. असे विधान एका मुलाखतीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

Protected Content