धक्कादायक ! शेजारील मित्रानेच केली मित्राच्या निष्पाप मुलाची गळा चिरून हत्या

रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रायगड जिल्हयात एका व्यक्तीने मित्राच्या मुलाची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जिल्हयातील उरण तालुक्यामधील चिर्ले गावात घडली आहे. धक्कादायक बाब अशी की, मुलाला सांभाळण्यासाठी देणाऱ्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच त्यांची गळा चिरून हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, उरण तालुक्यातील चिर्ले गावात बिंदू राम अजोर हे गृहस्थ पत्नी आणि आपल्या दहा वर्षांच्या हर्षसह मढवी यांच्या चाळीत भाड्याने राहत होते. पत्नी गावी गेल्यावर मुलगा आणि वडील घरी एकटेच राहत होते. बिंदू हे वाहनचालक असल्याने त्यांच्या घरी येण्याच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या ते कोणत्याही वेळी घरी परतायचे. ते कामासाठी बाहेर पडल्यावर घरात मुलगा एकटाच राहत असल्याने वडिलांना काळजी लागून राहायची याच अनुषंगाने त्यांनी आपला मुलगा बिंदू याला १४ मे रोजी मंगळवारी आपल्या मुलाला सोबतच घेऊन कामावर निघाले. मात्र वाहनातून मालाची डिलिव्हरी करण्यासाठी ग्लोबल लॉजिस्टिक्स टर्मिनलमध्ये लहान मुलाला प्रवेश देण्यास तेथील सुरक्षा रक्षकांनी नकार दिला.
त्यामुळे बिंदू यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कांताराम सिताराम यादव त्याठिकाणी आलेला दिसताच त्यांनी मुलगा हर्षला त्यांच्यासोबत घरी पाठविले. परंतू हर्ष घरी पोहचला की नाही हे तपासण्यासाठी फोन केला असता संपर्क होत नसल्याने बिंदू यांनी घर गाठले. मात्र मुलगा हर्ष घरी नसल्याने त्यांनी आणि कांतारामाने त्यांचा रात्रभर घराजवळ परिसरात शोध घेतला. त्यानंतर सकाळी उरण परिसरातील रिलायन्स कोस्टल रोड वरील खाडीत एका सुरक्षा रक्षकाला हर्ष याचा मृतदेह आढळून आला. सुरक्षारक्षकाने लगेच उरण पोलिसांना फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थही दाखल झाले. खाडीत धारदार शस्त्राने हर्ष याचा गळा चिरून हत्या करून टाकलेले मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने संशयित आरोपी कांतारामला पलायनाच्या तयारीत असतानाच ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच जुन्या भांडणाचा राग मनात धरून हर्षची आपण हत्या केली असल्याची कबुली आरोपी कांतराम यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास उरण येथील पोलीस यंत्रणा करत आहेत.

Protected Content