Home क्राईम सरपंचांच्या ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी

सरपंचांच्या ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी

0
59


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली शिवारातील शेतात पत्र्याचे शेडचे कुलूप तोडून चोरट्यांनी ट्रॅक्टरची ७ हजार रुपये किंमतीची बॅटरी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार, १४ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील भादली येथील मिलींद दत्तात्रय चौधरी वय ४० हे शेतकरी असून ते गावाचे सरपंच सुध्दा आहेत. त्याचे भादली शिवारात गट नं ५८३ मध्ये शेतजमीन आहे. या शेतात त्यांनी शेड केले असून त्याठिकाणी ते त्यांचे शेतीसाठी कामासाठी लागणारे ट्रॅक्टर उभे करतात. शनिवारी मिलिंद चौधरी हे दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास शेतात गेले असता, त्यांना शेतातील शेडला लावलेले कुलूप तुटलेले दिसले, तर शेडमध्ये उभ्या एम.एच.१९ सी.एस. ८४५९ या क्रमाकांच्या ट्रॅक्टरमधील बॅटरी चोरुन नेल्याचे समोर आले. याप्रकरणी मिलिंद चौधरी यांनी नशीराबाद पोलिसात तक्रार दिली असून आसोदा येथील कैलास पांडुरंग सपकाळे वय २६ या तरुणाने बॅटरी चोरुन नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीनुसर कैलास सपकाळे याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलीयार खान हे करीत आहेत.


Protected Content

Play sound