जळगावात आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । येथे समर्पण संस्थेतर्फे १७ पासून आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात आशियातील १५ देशांतील २५ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

या चित्रपट महोत्सवाच्या मोफत प्रवेशिका १२ फेब्रुवारीपासून कोल्हेनगरमधील शारदाश्रम विद्यालय आणि ३९, शाहू कॉम्प्लेक्स् येथील पर्यावरण शाळा येथे उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी राहुल सोळुंके, संदीप झोपे, अजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या महोत्सवामध्ये लीफ ऑफ लाइफ (इराण), लेडी ऑफ द लेक (मणिपूर), तासफिया (तजाकिस्तान), लीना (अफगाणिस्तान), सिन्सियरली युवर्स (बांगलादेश), ख्यानिका – द लॉस्ट आयडिया (ओडिया), टाइड हॅन्ड्स (इस्रायल), गेईओनी – व्हॅली ऑफ स्ट्रेन्थ (इस्रायल), तीन मुहूर्त (हिंदी), रानाज् सायलेन्स् (इराण), आक्रीत (मराठी), जोहार मायबाप जोहार (मराठी), मदरिंग (इराण), बेन्स बायोग्राफी (इस्रायल), रजनिगंधा (हिंदी), पुष्पक विमान (मराठी), भोर (हिंदी), अंडरपॅन्ट थिफ (श्रीलंका), बंदिशाळा (मराठी), तालन (कझाकिस्तान), भयकंम (मल्याळम), द बॅड पोइट्री (जपान), अ‍ॅन्ड वन्स अगेन (इंग्रजी), हान्दुक द हिडन कॉर्नर (असमिया), मरमेड (इराण) आदी चित्रपट प्रदर्शीत करण्यात येणार आहेत.

Add Comment

Protected Content