मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. यात मध्यंतरी तर ता भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आल्याने त्यांनी जाहीरपणे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी लागली होती. यातच विश्वासदर्शक मत प्रस्ताव आणि विधानसभाध्यक्ष निवडीच्या प्रसंगी त्यांची गैरहजेरी ही चर्चेचा विषय बनली होती. यानंतर आता शिवसेनेला फोडल्यानंतर भाजपचे पुढील टार्गेट हे कॉंग्रेस पक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व चर्चा सुरू असतांना अशोक चव्हाण हे फडणवीस यांच्या भेटीला पोहचले आहेत. आगामी मंत्रीमंडळ विस्तारात कॉंग्रेसमधील दोन मातब्बर नेत्यांचा समावेश असल्याची जोरदार चर्चा आज सकाळपासून सुरू झाली असतांनाच चव्हाण आणि फडणवीस यांची भेट सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.