मला बळीचा बकरा बनवले ; सचिन वाझे यांचा एनआयए कोर्टात दावा

 

मुंबई: वृत्तसंस्था  । अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडेलेल निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मला बळीचा बकरा बनवण्यात आलंय, असा दावा  एनआयए कोर्टात केला. 

 

सचिन वाझेंनी हा दाव केल्यानं  मोठा कट असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची माहिती इतर व्यक्तींना असू शकते, असं सचिन वाझेंनी एनआयए कोर्टात केलेल्या दाव्यावरुन स्पष्ट होते. सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात लेखी बाजू  मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी केल्याची माहिती आहे.

 

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयएनं सचिन वाझेंची कोठडी संपण्यास एक दिवस बाकी असताना UAPA कायद्यातील कलम लावलं आहे. 14 मार्चला एनआयएनं सचिन वाझेंना अटक केली होती. ठाणे कोर्टानं मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही एटीएसकडून एनआयएला देण्यासं सांगितलं आहे. त्यामुळे एटीएसनं आतापर्यंत जो तपास केला होता, जे पुरावे गोळा केले होते. ते सर्व एनआयएला द्यावे लागणार आहेत.

 

 

सहायक निरीक्षक सचिन वाझें भोवतीचा फास आणखीनच आवळला गेला आहे. वाझेंच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली आहेत. ही काडतुसे घरात का ठेवली होती? याचे उत्तर वाझे देत नसल्याचं एनआयएने विशेष कोर्टाला सांगितलं आहे. त्यामुळे वाझेंकडे ही काडतुसे आली कुठून? आणि त्यांनी ही काडतुसे का ठेवली आहेत? याबाबतचं गूढ वाढलं आहे.

 

यावेळी एनआयएने सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं कोर्टाला सांगितलं.  मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांना वाझेंच्या समोर बसवून तपास करायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी एनआयएने केली आहे.  वाझेंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा रिपोर्ट यायचा बाकी आहे.  वाझेंच्या गाडीतून मिळालेले पुरावे फोरेन्सिक पुराव्याशी पडताळणी करून पाहायचे आहे. डीएनए मॅच करण्यासाठी पाचही गाड्यांचे सँपल घेण्यात आले आहेत. आरोपीने सीसीटीव्ही डीव्हीआर गायब केला असून तोही शोधायचा आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आरोपीने 12 लाख रूपये दिले होते. त्याचीही माहिती घ्यायची असल्याचं एनआयएने कोर्टात सांगितलं आहे.  वाझेंच्या आवाजाचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे.

Protected Content