आडगाव येथे नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ !

चाळीसगाव प्रतिनिधी । शिवनेरी फाउंडेशन संचालित अभियान अंतर्गत भूजल अभियान जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली असून तालुक्यातील आडगाव येथून नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.                 

गेल्या तीन वर्षापासून भूजल अभियान तालुक्यात जल साक्षरता व जल संधारणाची कामे सुरू आहेत. दि. २३ मार्च रोजी गुणवंत सोनवणे यांनी आडगाव या गावी सेवा सहयोग फाउंडेशन च्या सहकार्याने पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले. ज्यातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षी चाळीसगाव तालुक्यात वॉटर कप स्पर्धेसाठी आ. मंगेश चव्हाण यांनी आर्थिक सहाय्य केले होते. आडगाव गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर पाणी अडवण्यासाठी स्वखर्चाने डिझेल टाकून पोकल्यान मशीनने प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. कोरोनाचा सावट असताना गतवर्षी तालुक्यातील ११ गावांमध्ये कामे होऊन ५३ कोटी लिटरचा जलसाठा निर्माण झाला होता.

यावर्षी ३५ गावांचे नियोजन पुर्ण झाले असुन ३५ गावांची माहिती संकलन करून गावांचा जल आराखडा तयार केला जाणार आहे. सदर कामाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आडगाव सरपंच रावसाहेब पाटील, कृषी सहायक तुफान खोत, ग्रामसेवक पाटील भाऊसाहेब, भूजल टीमचे तालुका समन्वयक राहुल राठोड, तांत्रिक प्रशिक्षक महेंद्र पाटील, दामु पाटील, शरद पाटील, विजय पाटील, संजय पाटील, रावण पाटील, किरण पाटील व मच्छिंद्र पाटील आदी  उपस्थित होते.

 

Protected Content