अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरूणाला जळगावातून अटक, मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा

मुक्ताईनगर/जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील उचंदा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील तरूणाने अत्याचार केल्याची दुपारी १ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी तरूणाला जळगावातील एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील नेपानगर येथील रहिवाशी असलेली अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे राहते. आईवडील आणि काका उदरनिर्वाह करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. मुलीच्या काकाचे घराच्या बाजूल पत्र्याचे खोलीत पिठाची गिरणी आहे. दरम्यान, त्यांच्या घराच्या शेजारी चेतन रविंद्र सुतार हा राहतो. आज दुपारी १२.४० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी चप्पल घेण्यासाठी पिठाच्या गिरणीत गेली असता त्याठिकाणी आधीपासून दबा ठेवून असलेला चेतन सुतार होता. त्याने मुलीचा हात पकडून तिच्या तोंडावर रूमाल बांधून मुलीवर बलात्कार केला. दरम्यान मुलीने पायाने पत्र्याच्या शेडला लाथा मारल्याने पत्र्यांच्या आवाजामुळे पिडीत मुलीचे आईवडील आले असता मुलगीवर अत्याचार केल्याचे दिसून आले. नातेवाईक आल्याचे पाहून चेतन सुतार हा घटनास्थळाहून पळ काढला. रात्री उशीरापर्यंत स्थानिक पोलीसांनी संशयित आरोपी चेतन सुतार याला अटक केली आहे. त्याच्याविरूध्द पोक्सो कायद्यान्वये मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी विवेक लावण हे करीत आहे. 

Protected Content