राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस !

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भावाला ईडी ने नोटीस बजावली आहे. याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. यापुर्वी जयंत पाटलांना देखील ईडीने नोटीस बजावली होती. त्यामुळे आता त्यांच्या भावाला ईडीने नोटीस बाजावल्याने राजकीय बैठका घेतल्या जात आहे.  परंतु बैठकीची बातमी माध्यमांना मिळाली. बैठकीत ईडीच्या नोटीससंदर्भात काय चर्चा झाली? यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर दोन गट तयार झाले. एक गट अजित पवार यांच्याबरोबर गेला तर दुसरा गट शरद पवार यांच्याबरोबर आहे. जयंत पाटील हे शरद पवार यांच्या गटात आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची ईडी चौकशी झाली होती. त्यात जयंत पाटील यांचाही समावेश आहे. जयंत पाटील यांची २२ मे २०२३ रोजी ईडीने चौकशी केली होती.  यात जयंत पाटलांना नऊ पेक्षा जास्त तास प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर २ जुलै रोजी अजित पवार यांनी बंड केले.

 

जयंत पाटील अजित पवार यांच्या गटात गेले नाही. यामुळे त्यांच्या निकटवर्तींना ईडीची नोटीस आल्याची चर्चा सुरु होती. जयंत पाटील यांचे बंधू जयसिंगराव पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, माझ्या भावाला चार दिवसांपूर्वीच नोटीस आली होती. ईडीने त्यांच्याकडून काही माहिती मागितली होती. ती माहिती त्यांनी दिली.

Protected Content