पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका भागातून १५  वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी शनिवार  १२ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पंधरा वर्षे अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह वास्तव्यास. शनिवारी दुपारी दोन वाजता सुमारास अल्पवयीन मुलगी घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी फुस लावून पळवून नेले.  अल्पवयीन मुलगी ही सायंकाळी उशिरापर्यंत हे घरी परत आली नाही अथवा इतरत्र दुसरीकडे कुठे मिळूनही आली नाही. अखेर अल्पवयीन मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याबाबत एमआयडीसी पोलिसांना तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपर्णाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.

Protected Content