कॅरम स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे , जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजीत तालुकास्तरीय शालेय शासकीय कॅरम स्पर्धा जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूल जामनेर येथे नुकतेच घेण्यात आले. यात स्पर्धेत पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले  माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

 

कॅरम स्पर्धेत रोशन राजेंद्र राऊत ( नववी ) आणि तुषार रमेश पवार (दहावी) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश  प्राप्त केले.  जिल्हास्तरीय  कॅरम स्पर्धेसाठी त्यांची  निवड झाली असून  त्यांना शाळेचे क्रीडा  विभाग प्रमुख हरीभाऊ  राऊत यांचे  मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत शाळेतील १२ खेळाडूंनी उत्स्फुर्त सहभाग नोदविला. त्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष  बाबूराव आण्णा घोंगडे, संस्था सचिव भगवान घोंगडे, सन्माननीय संचालक मंड , तालूका क्रीडा समन्वयक प्रा आसिफ खान सर मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे , जेष्ठ शिक्षिका कल्पना बनकर सह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Protected Content