आ. प्रताप सरनाईकांच्या निकटवर्तीयाला ईडीच्या पथकाने केली अटक

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे मित्र तथा टॉप्स समूहाचे भागीदार अमित चांदोळे यांना अटक केली आहे.

ङ्गटॉप्स सिक्युरिटीफ या समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यानंतर याप्रकरणी ईडीने सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे यांना अटक केली आहे. चांदोळे हे टॉप्स समूहाचे भागीदार आहेत.

चांदोळे यांच्या अटकेमुळे सरनाईक आणि राहुल नंदा यांच्यातील व्यवहारांबाबत माहिती समोर येण्याची शक्यता आहे. नंदा हे टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आहेत. या ग्रुपचे माजी सीईओ रमेश अय्यर यांनी नंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कंपनीच्या निधीचा बेकायदा पद्धतीने फेरफार केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक परदेशातून मुंबईत परतल्याने सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यांचा क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर ईडीद्वारे त्यांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात येईल.

Protected Content