आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई । क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबई कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आर्यन खानसह मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केलं होतं.

आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. जामीन अर्जावर तब्बल अडीच तास युक्तिवाद चालला. मात्र, अखेर कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

आर्यन खान आणि इतर दोघांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर एनसीबीला ड्रग्ज प्रकरणात अधिक चौकशी करता येणार आहे. मात्र, या निकालाविरोधात  सत्र न्यायालयात जाणार असल्याचं आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे. निकालाची प्रत मिळाल्यानंतर तातडीनं सत्र न्यायालयात जाणार असल्याचं वकिलांनी सांगितलं आहे.

 

 

Protected Content