नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा तीव्र आंदोलन – प्रभाकर साळवे

जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाया गेली असून या मागणीसाठी तीन दिवसापासून संभाजी ब्रिगेड तर्फे पाणी आंदोलन करण्यात येत असून यासंदर्भात आज नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांना लेखी निवेदन देण्यात आले. शासनाने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी बिग्रेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर साळवे यांनी दिला आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर साळवे, तालुका अध्यक्ष राम अपार, संतोष कुमावत, प्रवीण गावंडे, संदीप पाटील, किरण पाटील, दिलीप साळुंखे, उमेश कचरे, योगेश पाटील, पिंजारी सोपान, पाटील विशाल, पाटील डॉक्टर प्रफुल्ल, पाटील विजय, पाटील अमोल, पाटील नितीन आदी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यात अतिवृष्टी ढगफुटी व चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मका ज्वारी सोयाबीन कपाशी केळी या पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्याचबरोबर घराचे नुकसान झाले.

मात्र शासन स्तरावर फक्त पंचनामे झाले अजूनही शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्यामुळे संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर साळवे यांच्या नेतृत्वात संभाजी बिग्रेड तर्फे जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक येथून आंदोलनाला सुरुवात करण्यात आले असून लेखी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात आली आहे त्यामध्ये आधीच तोरणासारख्या महामारी मुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून परिणामी त्यांना आत्महत्या केल्या शिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन विलब न करता सरसकट सर्व शेतकर्‍यांना एकरी वीस हजार रुपये मदत तात्काळ द्यावी व शेतकऱ्यांना मदत करावी, जर असे शासनाने केले नाही तर संभाजी बिग्रेड तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.

 

Protected Content