हरताळा येथे वाचन कट्टा अंतर्गत कथाकथन

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या मराठी विभागामार्फत हरताळा येथील वाचनकट्टा अंतर्गत कथाकथनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

वाचनकट्टा अंतर्गत कथाकथन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच.ए. महाजन होते. प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ. ए. पी. पाटील, डॉ. छाया ठिगळे, प्रा. साळवे, डॉ. सी. जे. पाटील, डॉ. डांगे , व माजी विद्यार्थी रवींद्र टोंगळे यांची होती. प्रास्ताविक डॉ. डी. एन. बावस्कर यांनी केले. अध्यक्षीय मनोगतातून प्रभारी प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन यांनी वाचनाने व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होतो हे उदाहरणादाखल नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या प्रा. छाया खर्चे यांनी एक बोधपर कथा घेऊन त्यातून शिक्षणाचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन मराठी विभागाचा विद्यार्थी चेतन मोरे यांनी केले तर आभार किरण माळी यांनी मानले. याप्रसंगी हरताळा गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Protected Content