सरपंच महिलेच्या पतीच्या उपचारांसाठी महसूल अधिकारी , कर्मचाऱ्यांची मदत

 

 

भडगाव  : प्रतिनिधी । तालुक्यातील अंजनविहीरे येथिल रहिवाशी व सध्या नाशिक येथे म्युकरमायकोसिससाठी उपचार सुरु असलेले शशिकांत पाटील  यांना  भडगाव – पाचोरा येथील महसुल अधिकारी, कर्मचारी यांनी ३९ हजार रूपयांची आर्थिक मदत केली आहे.

 

महसुल कर्मचारी कोरोना काळात जिव धोक्यात घालुन परीवाराचा विचार न करता कर्तव्य चोख बजवत  आहेतच हे  महसुल कर्मचारी अंजनविहीरे येथील सरपंच सपना पाटील यांचे पती शशिकांत पाटील यांच्या मदतीला धावुन आले आहे. कोरोना काळात ग्रामस्थाना सुरक्षा  देत असतांना शशीकांत पाटील स्वताच कोरोना पाॅझिटीव्ह आले होते. त्याचे रूपांतर म्युकर मायकोसिस या गंभीर आजारात झाले.

 

वडिलांवर उपचारासाठी आर्थिक परीस्थिती सक्षम नाही. आमच्याकडे पैसा नाही.  आईने घरातले सर्व पैसे खर्च केले. शक्य असेल तिथून पैसे उचल केले. बँकेतून कर्ज घेतले. वडीलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत करा, असे आवाहन   कु. गायत्री पाटील या खान्देश कन्येने केले होते.

 

या आवाहनाला प्रतिसाद देत  खातरजमा करुन अधिकारी व कर्मचारी यांनी  ही मदत केली पाचोऱ्यांचे उपविभागिय अधिकारी राजेंद्र कचरे, भडगावचे  तहसिलदार सागर ढवळे, पाचोऱ्यांचे  तहसिलदार कैलास चावडे,  नायब तहशिलदार रमेश देवकर,   तलाठी आर. डी. पाटील, टोणगावचे  तलाठी राहुल पवारसह भडगाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी  शशिकांत पाटील यांच्या उपचारासाठी ३९ हजार रुपयाची आर्थिक मदत दिली  ३९ हजार रूपयाची आर्थिक मदत कु. गायत्री पाटीलच्या फोन पे खात्यावर पाठविली आहे. या  अधिकारी, कर्मचारी वर्गाप्रमाणे समाजसेवक, लोकप्रतिनिधी, पत्रकार, समाजसेवी संघटनासह खाजगी व्यक्तीनी देखिल आर्थिक मदत केली आहे.

 

Protected Content