पहूर, ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वादळी वार्यासह झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टी आणि गारपिटीने पहूर शिवारातील सांगवी , खर्चाणे , शेरी , लोढरी , सोनाळे आदी भागातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जामनेर तालुक्याला काल अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यात ज्वारी, बाजरी, मका , सूर्यफूल, टरबुज, कपाशी यासारख्या पिकांना जबर फटका बसला असून हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. पहुर शिवारात काल दुपारी वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली . केवळ अर्धा तास झालेल्या पावसाने शेत शिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जनावरांच्या चार्याचा प्रश्न
अवकाळी पावसामुळे जनावरांच्या सार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .ज्वारी बाजरी मका यासारख्या पिकांपासून उन्हाळ्यात जनावरांसाठी चार्याची व्यवस्था होत असते मात्र आज झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे चार्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी आणि पशुपालकांना अडचणी येण्याची शक्यता आहे.
पंचनाम्याची मागणी
अवकाळीच्या फटक्यामुळे परिसरातील शिवारात मोठी हानी झाली आहे. यामुळे प्रशासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून संबंधित शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी रमेश बनकर यांनी केली आहे. खर्चाणे येथे वाडी वर राहणार्या झोपड्यांवरील पत्रे उडाली . सोनाळा भागात टरबुजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना देखील मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.