Home प्रशासन तहसील उध्दव ठाकरे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात ब्राम्हण समाजाचे निवेदन

उध्दव ठाकरे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात ब्राम्हण समाजाचे निवेदन

0
59


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथे ठाकरे गटाच्या झालेल्या सभेत उध्दव ठाकरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून ब्राम्हण व हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या प्रकरणी भडगाव बहुभाषिक ब्राह्मण सेवा संघाच्यावतीने भडगाव तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा येथे नुकतेच ठाकरे गटाची सभा घेण्यात आली. यात उध्दव ठाकरे यांनी भर सभेत ब्राम्हण समाज आणि हिंदू धर्माच्या भावना दुखवतील असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. यासंदर्भात भडगाव येथील भडगाव बहुभाषिक ब्राह्मण सेवा संघाच्यावतीने भडगाव तहसीलदार हिवाळे व भडगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघांचे अध्यक्ष विनय जकातदार, टोणगाव गुरुजी, दिलीप सहस्रबुद्धे, विजय देशपांडे, बापू व्यवहारे, पुराणिक गुरुजी, उदय देशमुख, मंथन दीक्षित, सुभाष शेंदुर्णीकर, विवेक जकातदार, संजय जोशी, शशी झोडगेकर, ॲड.कुलकर्णी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound