पारोळा प्रतिनिधी । शहरातील पाणी टंचाई लक्षात घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनी वारंवार जलसंपदा विभागाकडे पाण्याच्या आरक्षणाबाबत प्रश्न मांडला होता. या आरक्षणाला बुधवारी (दि.18) रोजी मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजूर मिळाली आहे.
या बाबत बोलतांना त्यांनी सांगितले कि, मागील काळात शहराला अल्प पावसामूळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. इतर तालुक्याच्या मानाने पारोळा शहराला किमान १० ते १२ दिवसात पाणी पुरवठा शक्य झाला. तो फक्त मागील पाणी आरक्षणामुळे मागील वर्षी जलसंपदा विभागाच्या मदतीने धरणातील पाण्यातून शहराला २.१४.द.ळ.घ.फु. एवढे पाणी आरक्षण करून मिळाल्याने बोरी धरणातील पाण्याच्या साठ्याचा विशेष लाभ झाला. पुढील काळात २४ तास पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ट्य असल्याच त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शहराला २४ तास पाणी पुरवठा करणे बाबत योग्य नियोजन सुरु असून या बाबत राज्य शासनाच्या नगरउथान योजनेतून शहरात संपूर्ण जुनी पाईप लाईन बदलवणे, नवीन जलकुंभ उभारणे, फिल्टर प्लांट नव्याने करणे याचे नियोजन सुरु आहे. योजना तब्बल ४१ कोटी रुची असून या बाबत पारोळा न.पा कडून मागील काळातच प्रस्ताव दिला गेला.
या योजनेचा हा शेवटच्या टप्प्यात असून यावर्षी पावसाने जरी चांगली साथ दिली असली तरी वाढती लोकसंख्या पाहता पुढील १० वर्षाचे नियोजन केले जात आहे. या वाढीव ३.१४ द.ळ.घ.फु. आरक्षणाचा लाभ शहराला नक्की मिळणार असून शहराला भेडसावणाऱ्या नागरी समस्यावर यंत्रणा मोठ्या प्रमाणावर लक्ष देऊन आहेत. जसे आरोग्य, बांधकाम, पाणी पुरवठा, महिला बाल कल्याण आदी विभाग चांगले कार्य करत आहे. पाणी आरक्षणाच्या विषयात पारोळा येथे नुकत्याच झालेल्या महाजानादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारोळा शहराला पाणी आरक्षण देण्याबाबत सुतोवाच दिले होते. तो शब्द त्यांनी पूर्ण करत दि. १८ च्या बैठकीत याला मूर्तिमंत रूप दिले. तसेच जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, खा. उन्मेष पाटील यांचे अनमोल सहकार्य मिळाल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले.
यामुळे शहरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.