मुक्ताईनगर येथे वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

मुक्ताईनगर प्रतिनिधी | येथे श्रेयस काठोके या बालकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर येथे तुळशीराम सिताराम काठोके यांचे नातू श्रेयस अक्षय काठोके याच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त त्यांचे राहते घर संताजी नगर ,तहसील रोड मुक्ताईनगर येथे ९ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केलेले आहे. तसेच १५ नोव्हेंबर रोजी एकादशीनिमित्त रात्री आठ वाजता भजनाचे आयोजन केलेले आहे. १६ नोव्हेंबर रोजी वाढदिवसानिमित्त सकाळी ८ ते १० हरिभक्त पारायण रविंद्र महाराज हरणे यांच्या कीर्तनाचे आयोजन केलेले आहे. दुपारी १२ ते ४ भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकामार्फत करण्यात येत आहे. पारायण सोहळा यशस्वीतेसाठी ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, हभप उद्धव महाराज जुनारे, ह.भ.प. कृष्णा महाराज तळणीकर, ह.भ.प लखन महाराज, ह.भ.प पंकज महाराज पाटील, तसेच मुक्ताई फडावरील वारकरी ,कीर्तनकार महाराज ,टाळकरी यांचे सहकार्य लाभत आहे.

Protected Content