खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा विभागातर्फे बेटी बचाव- बेटी पढाव अभियान उत्साहात

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | दरवर्षी सावित्रीबाई फुले यांचे जन्मदिन बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने येथील जी.जी. खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे बेटी बचाव- बेटी पढाव अभियान उत्साहात पार पडला.

देशात सावित्रीबाई फुले यांचे जन्मदिवस हे बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या बालिका दिन-सप्ताहाचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथील जी.जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित बेटी बचाव -बेटी पढाव अभियान उत्साहात संपन्न झाला. सदर अभियानाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. छाया ठिंगळे तर मार्गदर्शक वाणिज्य विभागातील प्रा. विद्या घडेकर हे उपस्थित होते. दरम्यान आपल्या मार्गदर्शनात विद्या घडेकर यांनी सन २०११ च्या जनगणनेनुसार भारताचा लिंग गुणोत्तर दर हे हजारी ९४३ इतका आहे. म्हणजेच स्त्री आणि पुरुष यांच्या प्रमाणाचा असमतोलपणा आहे‌ म्हणून प्रत्येक कुटुंबाने बेटी बचाव – बेटी पढाव चा नारा दिला पाहिजे असे आवाहन केले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. छाया ठिंगळे यांनी आज देशभरात आणि राज्यात लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असल्याने स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. म्हणून राज्यात आणि देशात लिंग गुणोत्तर चे प्रमाण वाढले. तर स्त्रियांचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास साधला जाईल, परिणामी कुटुंब, समाज आणि देश समृद्ध होईल अशी आशा व्यक्त केली.

या बालिका दिनाच्या – सप्ताहात बेटी बचाव – बेटी पढाव, मुलगी वाचवा – मुलगी शिकवा असा जयघोष करत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा आणि आजूबाजूच्या परिसपरिसरात जनजागृती केली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महाजन बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे उदघाटन केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संजीव साळवे प्रा.डॉ. प्रतिभा डाके प्रा. राजन खेडकर यांनी केले. समन्वयक म्हणून प्रा. डॉ. दीपक बावस्कर तर सहसमन्वयक प्राध्यापक विजय डांगे आदींनी परिश्रम घेतले.

या अभियानाप्रसंगी दीप्ती पाटील, नेहा वाणी, भाग्यश्री जयकर, श्रद्धा गिरी, मुक्ता पाटील, रीना पांडे, आकांक्षा मेढे, भावना ठोंबरे, पूजा गिरी मोनिका धायले, जयश्री दुटटे, अचल कवळे, चैताली वलस्कर, भाग्यश्री बोरोले, गायत्री महाजन इशिका पाटील, दिशा चौधरी, वैष्णवी चौधरी, आयुषी पाटील, सानिका चौधरी, ऋत्विक देशमुख, प्रभू महाजन, स्वप्नील खिरडकर, राजकुमार गायकवाड, सतीश इंगळे, ललित लांडे, रोशनी बहिरकर, धनश्री सदावर्ते, विशाल जयकर, पवन चौधरी, धनराज कोळी व मंगेश बराटे इत्यादी विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री बोराखडे, प्रास्ताविक तेजस सरोदे आणि कुणाल बोदडे तर आभार प्रदर्शन कृष्णा कोळी यांनी मानले.

Protected Content