यावल महाविद्यालयात क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात

यावल प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील पाटील हे उद्घाटक होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे  यांनी भूषविले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरूवातीस मैदानाची विधीवत पूजा करून सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी एरंडोल विभागाचे सचिव डॉ. शैलेश पाटील  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जळगाव विभागाचे सह सचिव डॉ.पी. आर. चौधरी यांनी स्पर्धकांना नियमावली सांगितली. अध्यक्ष डॉ.संध्या सोनवणे यांनी प्रतिपादन केले की खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास होतो. अध्यक्ष डॉ. संध्या सोनवणे यांनी प्रतिपादन केले की शारीरिक विकास करण्यासाठी खेळ गरजेचा आहे. या आंतर विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेच्या दहा किलोमीटरच्या अंतरावर राष्ट्रीय खेळाडू सुरज भालेराव या विद्यार्थ्यांने सांगवी गावाजवळ स्पर्धकांसाठी विनामूल्य पाण्याची सेवा उपलब्ध करून दिली.

सदर स्पर्धा सेवा निवृत्त क्रीडा संचालक प्रा. महेंद्र सोनवणे  यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू केली .या स्पर्धेत मुलींमध्ये प्रथम सहा व मुलांमध्ये प्रथम सहा स्पर्धकांची विद्यापीठ स्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेत जळगाव, एरंडोल ,धुळे व नंदुरबार विभागातील मुले व मुली  मिळून आठ संघ सहभागी झाले होते. यात एकूण 48 स्पर्धक होते .संघ प्रमुख म्हणून प्रा. राजधर बेडसे, प्रा. हर्षवर्धन सरदार, प्रा. नीलिमा पाटील, प्रा. चंद्रकांत डोंगरे, डॉ. शैलेश पाटील, डॉ. लिंबाराम प्रताके ,डॉ. दिनेश तांदळे, डॉ. किशोर वाघ ,प्रा.डी.टी. सूर्यवंशी ,प्रा.अनिल देसाई ,डॉ. महेश पाटील ,प्रा.सुभाष वानखडे व डॉ. अमोल पाटील उपस्थित होते .

क्रीडा स्पर्धेचे आयोजन क्रीडा समिती प्रमुख डॉ.पी.०ही .पावरा व उपप्राचार्य प्रा . ए. पी .पाटील यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार प्रा. एम .डी खैरनार यांनी मानले. स्पर्धा यशस्वितेसाठी डॉ.एस.पी कापडे, प्रा. संजय पाटील, प्रा. एस .आर. गायकवाड, डॉ. एच जी. भंगाळे ,डॉ आर.डी. पवार, प्रा. मनोज पाटील, मिलिंद बोरघडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content