राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी शेख मुस्तकीम यांची नियुक्ती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) या पक्षाच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी अल्पसंख्यांक समाजाचे शेख मुस्तकीम गुलाम मुस्तफा (सद्दाम भाई ) नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पातळीवर ,तालुका पातळीवर व गावपातळीवर संघटन कार्य बळकट करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जळगाव जिल्हा ग्रामीण क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी शेख मुस्तकीम गुलाम मुस्तफा यांची यावल तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष रविन्द्र भैय्या पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ता अतुल पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पवन पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ पदाधिकारी एम.बी. तडवी, मोहसीन खान, नाना कौत्तीक बोदडे, बापु जासुद, अय्यूब खान, अरूण लोखंडे, आबिद कच्छी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content