रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । २०२४ च्या लोकसभा निवडणुका शेवटच्या निवडणुका असून पुढील काळात आमदार किंवा खासदार यांच्या निवडणुका होतील की नाही यात साशंकता आहे. मागील चार वर्षा पासुन सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपा पुन्हा संधी देऊ नका. रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केले आहे.
रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीरामपाटील यांच्या प्रचारार्थ नियोजनसाठी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी मनोगत व्यक्त करतांना रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील म्हणाले ‘रावेर तालुक्यावर अन्याय करण्यासाठी विद्यमान खासदारांनी महामार्ग वळविला आहे. याबाबत जनतेत प्रचंड असंतोष आहे. इतर ठिकाणावरुन महामार्ग वळविला जात आहे. तिकडे देखिल महामार्गाला शेतक-यांचा विरोध आहे. त्यामुळे मला यावेळेस संधी द्यावी मी शेतकरी व जनतेला येणाऱ्या समस्या सोडवल्या जातील असे प्रतिपादन रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी केले.
मेळाव्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, माजी आमदार अरुणदादा पाटील, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार लोकसभा प्रमुख अतुल पाटील, शिवसेना(उबाठा) लोकसभाक्षेत्र प्रमुख प्रल्हाद महाजन, माजी झेडपी अध्यक्ष मुरलीधर तायडे, किसान सभेचे सोपान पाटील, बाजार सिमिती संचालक मंदार पाटील, शिवसेना उबाठा रविंद्र पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना (उबाठा) योगिराज पाटील,राजेश घोळफडे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील,धनंजय चौधरी,राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष महेमुद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक जणांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.