शेंदुर्णीच्या गरूड महाविद्यालयात नीट, सीईटी क्लास अत्यल्प दरात सुरू होणार

शेंदुर्णी (प्रतिनिधी) परीसरातील विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी आर्थिक परीस्थितीमुळे नीट, सीईटी क्लास तयारी करू शकत नव्हते. परंतू आता शेंदुर्णीच्या गरूड महाविद्यालयात नीट, सीईटी क्लास अत्यल्प दरात सुरू होणार आहेत. शेंदुर्णी एज्युकेशनचे चेअरमन व जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरुड यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.

 

शेंदुर्णी व परीसरातील विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी आर्थिक परीस्थितीमुळे नीट, सीईटीची तयारी करू शकत नव्हते. ही बाब धी शेंदुर्णी एज्युकेशनचे चेअरमन व जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरुडांच्या लक्षात आली. संस्थेची जागा मोठया प्रमाणात आहे. फक्त गरज आहे तज्ञ मार्गदर्शकांची. त्या दृष्टीने तात्काळ औंरंगाबाद, पुणे, मुंबई येथील तज्ञ मार्गदर्शकांशी चर्चा केली. त्यांना परीसराची संपूर्ण माहिती दिली. शेंदुर्णी व परिसरातील नागरिकांचा मुख्य उपजिवीकेचे साधन शेती आहे. त्यामुळे अत्यंल्प दरात येथे आपल्याला (नफा ना तोटा ) या हेतूने ज्ञानांर्जन करावे लागेल. असे ठरल्यावर मुंबई , पुणे च्या तुलनेत महीन्याला एक हजार प्रमाणे अत्यल्प खर्चात दर शनीवार, रविवार ६ तास या शैक्षणिक वर्षापासून आस्थापना केंद्र सुरू होत आहे यात NEET, CET ची P/C/B/M शेड्यूल अभ्यासक्रम पूर्ण करतील. जागतिक आपत्ती कोरोना काळातील पालकांची आर्थिक चिंता संस्थेने सोडविली. त्यामुळे पालकांनी या उपक्रमाबद्दल प्रत्यक्ष भेटून, दुरध्वनी व वरून चेअरमन संजय गरूडांचे अभिनंदन केले. तर शेंदुर्णी व परीसरातील विद्यार्थी यात प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी संस्थेचे चेअरमन प्रतिनिधी संजय देशमुख, मुख्याध्यापक डी.आर. शिंपी, संजय पाटील सर यांच्याशी पालक, विद्यार्थी यांनी संपर्क साधावा,असे कळविण्यात आले आहे.

Protected Content