भाजपला विरोध करणे, म्हणजे हिंदूंना विरोध करणे नाही : भैय्याजी जोशी

bhaiyyaji joshi

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपला करण्यात येणारा विरोध म्हणजे, हिंदूंचा विरोध नाही. ही एक राजकीय लढाई आहे जी सुरूच राहणार आहे. याला हिंदूशी जोडणं अत्यंत चुकीचे असल्याचे मत संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे. ते गोव्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

 

गोव्यामधील दोनापावला येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने ‘विश्वगुरू भारत-आरएसएसचा दृष्टीकोन’ या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये मार्गदर्शन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश ‘भैयाजी जोशी’ म्हणाले की, ‘भाजपला विरोध करणे म्हणजे, हिंदूंना विरोध करणे नाही. तर हिंदू आपल्याच समुदायाचे दुश्मन बनत आहेत, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, ‘भाजपला करण्यात येणारा विरोध म्हणजे, हिंदूंचा विरोध नाही. ही एक राजकीय लढाई आहे जी सुरूच राहणार आहे. याला हिंदूशी जोडणं अत्यंत चुकीचे असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.

Protected Content