मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील रुईखेडा येथील एम.एम. नारखेडे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी नितीन भोंबे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
नितीन प्रल्हाद भोंबे यांनी १९९६ साली निमखेडी खुर्द येथून आपल्या कारकीर्दला सुरूवात केली. त्यानंतर त्यांची बदली रूईखेडा येथे झाली. त्यांचे शिक्षण एम.ए.बी एड इंग्रजी या विषयामध्ये झालेले आहे. मुख्याध्यापक पदाचे सुत्र सांभाळताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी शैक्षणिकपाञता उंचावणे, विद्यार्थी संख्या वाढीवर भर देणे, डिजीटल शिक्षण, या गोष्टीवर अधिक भर दिला पाहिजे. तसेच भोंबे यांचे अभिनंदन आ. एकनाथराव खडसे, संस्थेच्या अध्यक्षा रोहीणीताई खेवलकर, सचिव डॉ. सी.एस.चौधरी, स्कुल कमिटीचे चेअरमन बंडू बढे, विजय भंगाळे, क्रीडा शिक्षक संजीव वाढे, विनोद पाटील, प्रदिप राणे, अनिल कोलते, संतोष राठोड, योगाता झांबरे, बबिता तडवी आणि आदींनी केले.