चोपडा येथील पंकज विद्यालयात पालक-शिक्षक सभा

chopada palak sabha

 

चोपडा प्रतिनिधी । येथील पंकज विद्यालयात नुकतीच पालक-शिक्षक सभा घेण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, पालक सभेची सुरुवात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सलगीने केली. प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सिंग अ वेलकम सॉंग, बीज कविता, रोली पोली, स्वछता गीत, अग्गोबाई ढग्गोबाई इत्यादी कविता व इंग्रजी संवादाचे डेमो यावेळी सादर केले. सुजाण पालकत्व या विषयावर आर.डी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, पालकत्व हि दोघांची म्हणजे आई बाबांची जबाबदारी आहे. त्यात त्यांनी संस्कार, सुट्टीचा सदुपयोग, सुसंवाद, सकारात्मक शिस्त, गुणवत्ता पूर्ण शिक्षण, आहार, शिक्षक पालक संबंध, मूल्यशिक्षणाची गरज यांसह विविध बाबींवर प्रकाश टाकला. इयत्ता पहिलीच्या वर्गाचा अभ्यासक्रम व पंकज स्कॉलर उपक्रमाची तयारी याविषयी गायत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्ही. पाटील यांनी पालकांना नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा आणि श्रमप्रतिष्ठा इत्यादी मूल्यांविषयी मार्गदर्शन केले. पालक हा एक अनुभवसिद्ध प्रवास असलेची जाणीव यावेळी करुन दिली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष टी.ए. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमप्रसंगी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. सूत्रसंचालन उज्ज्वला जाधव यांनी तर आभार आर.डी. पाटील यांनी मानले आहे.

Protected Content