किनगाव येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलच्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थी विद्यार्थीनींचा निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच स्कुलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

या कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून केंन्द्र प्रमुख प्रदीप सोनवणे हे होते. यावेळी स्कुलचे सचिव व स्व.केतन मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष मनिष पाटील,  पुनम पाटील, प्रथमिक विभागाचे मुख्याध्यापक अशोक पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय उधोजी व इतर शैक्षणीक क्षेत्रातील गुरूवर्य आणी मान्यवर उपस्थीत होते.

या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिणी उधोजी, दिनकर पाटील, अरविंद सोनकुसरे, शाहरुख खान, रश्मी शेख, मिलिंद भालेराव, गोपाल चित्ते, दिलीप संगेले, राजश्री अहिरराव, संपत पावरा, हर्षल मोरे, सुहास भालेराव, वैशाली धांडे, भारती साठे, पवन महाजन, अनिल बारेला, सुनील चौधरी, भावना चोपडे, देवयानी साळुंखे, प्रतिभा धनगर, तुषार धांडे, नेहा धांडे, योगीता बिहारी, बाळासाहेब पाटील इ.शिक्षकांचे सहकार्ये मिळाले. या कार्येक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी केले.

Protected Content