राज्य निवडणुक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची नियुक्ती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांच्या शिफारसीनंतर राज्यपालांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली असून, या संदर्भातील आदेश राज्य सरकारने जाहीर केला आहे.

दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी असून, त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षमता पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली. मंत्रिमंडळाने निवडणूक आयुक्त निवडीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना सोपवले होते.

दिनेश वाघमारे यांच्यावर राज्य निवडणूक आयुक्तांवर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतचे अधिक्षण, संचालन व नियंत्रण करण्याची तसेच त्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राहील. दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती मिळणार नाही.

Protected Content