पारोळ्यात महाराणा प्रताप पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्वी अर्पण करणारे तसेच मातृभूमीसाठी कधीही तडजोड केली नाही फारच कष्ट सहन केले, रणांगणात कधी हार मानली नाही, ज्यांनी कित्येक वर्ष जंगलात राहून गवत खाऊन दिवस काढले पण हरले नाहीत असे महान योद्धे हिंदू सूर्य वीर शिरोमणी मेवाड नरेश पराक्रमी योद्धा चितोडाधिपती नरव्याघ्र महाराणा प्रताप यांचे प्रत्येकाने गुण अंगीकारावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी केले. पारोळा शहरातील महाराणा प्रताप चौक येथे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते नि बोलत होते.

यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळू गीते, मोहाडीचे माजी सरपंच रामचंद्र पाटील, ग्राम विस्तार अधिकारी डी.ए राजपूत, रमेश चौधरी यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी प्रकाश पाटील, देवेंद्र पाटील, गणेश राजपूत, मनोज नरसिंग राजपूत, विशाल राजपूत, शिवाजी राजपूत, दिलीप सोनार, नाना राजपूत, योगेश पाटील, प्रवीण पाटील, भैय्या पाटील, संजय चौधरी यांच्यासह राजपूत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content