जळगाव (प्रतिनिधी) । बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित तथा उद्योजक सुनील झंवरला मुंबई हायकोर्टाने दोन आठवडे अटकेपासून हायकोर्टाने संरक्षण दिले. त्यानुसार झंवरला न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दोन आठवड्याची संधी मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
याबाबत वृत्त असे की, बीएचआर सहकारी पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडोर यांना हाताशी धरून सुनील झंवर यांनी अनेक मालमत्ता कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. याप्रकरणी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पुणे येथील न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत सुनील झंवर यांचा मुलगा सूरज झंवर यांच्यासह इतर पाच जणांना अटक करण्यात आलेली असली तरी प्रमुख संशयित सुनील झंवर आणि तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे हे मात्र आतापर्यंत पोलिसांना मिळून आले नाहीत. दरम्यानच्या काळात सुनील झंवर हा वेषांतर करून जळगावात आल्याची चर्चा होती. याच प्रकारे पोलिसांनी जंग जंग पछाडूनही सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे यांचा पत्ता अद्यापही लागलेला नव्हता. दरम्यान, पोलीस प्रशासनाने सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे यांच्या घरावर आर्थीक गुन्हे शाखेने चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तर त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली होती.
मुंबई उच्च न्यायालयात सुनील झंवरने फिर्याद रद्द होण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनवाईअंती झंवरला दोन आठवडे अटकेपासून हायकोर्टाने संरक्षण दिले. त्यानुसारला झंवरला आता न्यायालयात आपले म्हणणे मांडता येणार असून नियमितपणे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दोन आठवड्याची संधी मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.