भडगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पिचर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी प्रतिनिधी म्हणून आदर्श कन्या शाळेचे मानद सचिव तथा आदर्श शेतकरी आण्णासो दिपक संभाजी महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता पिचर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळाच्या उपस्थितीत आण्णासो दिपक संभाजी महाजन यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सोसायटीच्या संचालक मंडळाने एकमुखाने त्यांच्या नावाला पसंती देत प्रतिनिधी म्हणून त्यांची बिनविरोध निवड केली. संस्थेचे चेअरमन श्रीराम रामदास पाटील, व्हा. चेअरमन हिलाल ओंकार महाजन यांच्यासह संचालक मंडळातील श्रावण लिंडायत, साहेबराव पाटील, बबन पाटील, उद्धव महाजन, मुरलीधर पाटील, अशोक पाटील, हेमराज पाटील, प्रविण कुंभार, सौ. बेबाबाई पाटील आणि सचिन पाटील यांनी ठरावास एकमुखाने मंजुरी दिली. यावेळी ठरावाचे सूचक म्हणून श्रावण लिंडायत यांनी, तर अनुमोदक म्हणून हेमराज पाटील यांनी भूमिका बजावली. संस्थेचे सचिव एन. टी. पाटील तसेच लिपिक वसंत पाटील यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडले. आण्णासाहेब दिपक महाजन यांच्या बिनविरोध निवडीचे वृत्त समोर येताच पिचर्डे परिसरासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा अनुभव तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, गावातील नागरिक तसेच सोसायटीचे सभासद यावेळी उपस्थित होते.

या निवडीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि सभासदांचे यावेळी मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. बिनविरोध निवडीमुळे सोसायटीच्या सभासदांमध्येही समाधानाचे वातावरण असून, आण्णासो दिपक महाजन यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पिचर्डे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या प्रतिनिधीपदी आण्णासो दिपक संभाजी महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याने सहकार क्षेत्रात त्यांची नवी जबाबदारी निश्चित झाली असून, या निवडीचे परिसरातून स्वागत होत आहे.



