अमळनेर, विशेष प्रतिनिधी | सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्तानंतर येथील अनिल भाईदास पाटील यांनी आज (दि.१९) सायंकाळी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे नाकारले आहे.
त्यांच्या शिवसेना प्रवेशाची दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे अनिल पाटील यांना याबाबत खुलासा करावा लागला असून त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना प्रवेशाबाबत वृत्ताचा इन्कार केला आहे. “मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच असून राष्ट्रवादीतर्फेच उमेदवारी करेन” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.