तिवसा येथील तरूणाची गळफास घेवुन आत्महत्त्या

death penalty hanging

वर्धा प्रतिनिधी । जिल्ह्यातील तिवसा येथील तरूणाने सत्याग्रही घाटातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शामजी पंत पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील तळेगाव पोलिस हद्दीतील सत्याग्रही घाटातील बाहूबली मंदिराच्या पायरीजवळ पळसाच्या झाडाला ऋषीकेश इंगळे (वय-18) रा. तिवसा ता.जि. वर्धा या तरूणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आला. दरम्यान आत्महत्या करण्यापुर्वी तरूणाने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न असफल झाल्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळी मयताचे अधार कार्ड, बॅग, मोबाईल आणि पाकिट आढळून आले. मोबाईलवरून संपर्क केला असता त्याची ओळख पटली. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने चुलत भाऊ अनिकेत इंगळे याला फोन करून सांगितले की, ‘माझ्या वडीलांची, काकांची, तुझी आणि सर्वांची काळजी घे, मी तुला उद्याला भेटतो’ असे सांगून त्याने फोन कट केला होता. त्यानंतर अनिकेतने पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.

मयत ऋषीकेश हा तिवसा येथील यादवराव देशमुख महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तळेगावातील काही मंडळींचा बाहुबली मंदिरात जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. जेव्हा ही मंडळी स्वयंपाक करण्याचे साहित्य नेत असताना काही मंडळीला हा तरूणाने गळफास घेतल्याचे समोर आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला. आर्वी येथील रूग्णालयात शवच्छिेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.नि.रवी राठोड, पीएसआय धीरज राजुरकर, विजय उइके आदी करीत आहे.

Protected Content