पोलीसात तक्रार केल्याचा राग; महिलेवर विळ्याने प्राणघातक हल्ला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी येथील चक्कीजवळ पोलीस तक्रार केल्याच्या कारणावरून महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केली तर महिलेवर एकाने विळ्याने वार करून दुखापत केल्याची घटना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिलेल्या माहितीनुसार, अंजनाबाई सुधाकर मोरे वय-३० या महिला आपल्या मुलासह भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी येथे वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करते. दरम्यान महिलेने पोलीसा केलेल्या तक्रारीचा रागातून गावात राहाणारे भाईदास धुललकर, शानुबाई धुलकर, सागर धुलकर आणि जीवन सोनवणे सर्व रा. जोगलखोरी ता. भुसावळ यांनी महिला अंजनाबाई व त्यांचा मुलाला बेदम मारहान केली तर सागर धुलकर याने हाता विळा घेवून महिलेवर वार केल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत केली. जखमी महिलेने पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणारे  भाईदास धुललकर, शानुबाई धुलकर, सागर धुलकर आणि जीवन सोनवणे सर्व रा. जोगलखोरी ता. भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास बाविस्कर करीत आहे.

Protected Content