चारचाकी वाहनाच्या धडकेत दोन जण जखमी

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव ग्रामीण रुग्णालयासमोर रस्त्यावर उभे असलेल्या दोघांना भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. याप्रकरणी मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, इकबाल रमजू पटेल वय-३१ रा. कंडारी बुद्रुक ता. धरणगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता इकबाल पाटील हा त्याचा मामा साफिक ईसा पाटेल यांच्यासोबत धरणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर आलेले होते. त्यावेळी ते रस्त्यावर उभे असताना भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहन क्रमांक (एमएच १४ एफसी ४४०९) या वाहनाने त्या दोघांना धडक दिली. सुदैवाने दोघेजण बचावले मात्र यात ते जखमी झाले आहे. त्यांना नजीकच्याच धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता इकबाल पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार चाकी वाहनावरील अज्ञात चालका विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.

Protected Content