जुन्या वादातून दोन भावांन प्राणघातक हल्ला

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगावातील विकास कॉलनीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन भावांना चाकू, लोखंडी रॉड, फायटर व विटा दगडांनी मारहाण करून दुखापत केल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता मारहाण करणाऱ्या ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे जुबेर अली जाकीर अली सैय्यद हा तरूण वास्तव्याला आहे. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जुबेल अली व त्याचा भाऊ अकीब अली या दोघांना जुन्या भांडणाच्या कारणावरून वरणगावात राहणारा अरबाज सैय्यद जाकीर सैय्यद उर्फ पैलवान याच्यासह इतर ११ जणांनी चाकू, लोखंडी रॉड, फायटर व दगड विटांनी दोघांना जबर मारहाण करून जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर जुबेर अली जाकीर अली याने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अखेर मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजता मारहाण करणारे अरबाज सैय्यद जाकीर सैय्यद उर्फ पैलवान, अज्जू शेख मजिद, समिर शेख मजिद उर्फ टेलर, मजहर शेख मजिद फजान शेख मितर मुजाहिद सैय्यद शाबीर सैय्यद उर्फ मज्जू इंजिनिअर, राहिल सैय्यद उर्फ पैलवान, शाहीर सैय्यद शाबीर सैय्यद, मुक्तार शेख बशिर, ताबिज सैय्यद सईद सैय्यद आणि शोएब अंगड्या सर्व रा. वरणगाव याच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे.

Protected Content