फैजपूरात ऑटो पार्ट्स दुकान फोडले

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रोडवरील असलेले ऑटो पार्टचे दुकान फोडून ६७ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फैजपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख इरफान शेख आरिफ (वय-३५) रा. मित्तल नगर, फैजपूर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ऑटो पार्ट्स विक्रेत्याचे काम करतात, त्यामुळे त्यांचे फैजपूर ते भुसावळ रोडवर नॅशनल ऑटो पार्ट्स दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार ९ जुलै रोजी रात्री १० वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. त्यानंतर पाऊस सुरू असल्याने त्यांनी दुकान उघडले नाही. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद असलेले दुकान फोडून दुकानातील दुचाकीचे सीट कव्हर, हॅलोजन राईट, ब्रेक, स्क्रॅप सामान यांच्यासह अधिवस्तूंसह असा एकूण ६७ हजार ४८४ रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. १२ जुलै रोजी नेहमीप्रमाणे ते सकाळी आले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली. बुधवार १३ जुलै रोजी सायंकाळी शेख इरफान शेख आरिफ यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल पाटील करीत आहे.

Protected Content